कुणबी प्रमाणपत्र दिले, तरुणाने जाळले- Maratha Reservation
Maratha Reservation: मराठवाड्यातील पहिले कुणबी प्रमाणपत्र कारी गावातील तरुणास प्रदान केले. मात्र, या तरुणाने मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा असल्याचे सांगत प्रमाणपत्र जाळून टाकले.
धाराशिव: १९६७ पूर्वीच्या नोंदी व पुराव्याच्या आधारे मराठा समाजातील रा नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी रात्री धडकला. याआधारे धाराशिव जिल्हा प्रशासनाने बुधवारी सकाळीच मराठवाड्यातील पहिले कुणबी प्रमाणपत्र कारी गावातील तरुणास प्रदान केले. मात्र, या तरुणाने मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा असल्याचे सांगत प्रमाणपत्र जाळून टाकले.
धाराशिव जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेत ४५९ कुणबी नोंदी आढळल्या. ज्या व्यक्तींच्या नावे या नोंदी आहेत, त्यांच्या रक्तातील वारसांना प्रमाणपत्राचे वाटप बुधवारपासून सुरू झाले आहे. ४५९ पैकी ११० नोंदी या एकट्या कारी गावातील आढळून आल्या आहेत.
धाराशिव येथील सुमित भरत माने यांच्या पणजोबांच्या नावे असलेल्या कागदपत्रांमध्ये कुणबी नोंद आढळून आल्याने हा पुरावा ग्राह्य धरत बुधवारी सुमित माने या तरुणास तातडीने कुणबी जातीचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
सुमित माने याने जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र स्वीकारले. परंतु, नंतर सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे सांगत प्रशासनाने दिलेले प्रमाणपत्र दुपारनंतर त्याने जाळून टाकले.
Web Title: Maratha Reservation Kunbi certificate given, burnt by a young man
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App