आरक्षण मिळूदे तुला हिसकाच दाखवतो, खूप दिवस झालं तुझी…”, जरांगे-पाटलांचा भुजबळांना इशारा
Manoj Jarange Patil: ‘येवल्याचा येडपट’ म्हणत छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल.
Maratha Reservation: बीडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची महाप्रलय सभा पार पडली. या सभेत जरांगे-पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ‘येवल्याचा येडपट’ म्हणत हल्लाबोल केला. एकदा आरक्षण मिळूदे तुला हिसकाच दाखवतो. खूप दिवस झालं तुझी फडफड चालू आहे, असं एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.
जरांगे-पाटील म्हणाले, (Manoj Jarange Patil said) “कुणी म्हणत हॉटेल जाळलं, घरे जाळली. पण, शांततेत असलेल्या मराठ्यांवर खोटा डाग लावला गेला. यांनी यांचेच हॉटेल जाळले. निष्पाप तरूणांना गुंतवण्याचं काम सरकारनं केलं. मात्र, मराठ्यांना शांतता हवी आहे.”
येवल्याच्या येडपाटानं बीडमधील पाहुण्याचं हॉटेल जाळलं. सरकारही भुजबळांचं ऐकत आहे. छगन भुजबळ आता ‘जरांगे साहेब’ म्हणत आहेत. भुजबळांना समज दिल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलं. मी गप्प बसलो. नंतर मी म्हाताऱ्याला काहीही बोललो नाही. आता येडपट माझी शाळा काढत आहे. याला कुणी मंत्री केलं? हा महाराष्ट्राचा कलंक आहे,” अशी टीका जरांगे-पाटलांनी छगन भुजबळांवर केली आहे.
“सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्या एकट्याचं ऐकून जर तुम्ही आमच्याविरोधात भूमिका घेऊन आरक्षणात आडकाठी आणणार असाल, तर शहाणे व्हा. मराठा समाजाला ताटकळत ठेऊ नका. नाहीतर शांततेत तुमचा सुफडा साफ केला जाईल,” असा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे. मराठ्यावर अन्याय केला तर जड जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी केला.
बीड मध्ये सरकारला इशारा २० तारखेच्या आत आरक्षण देता आले तर बघा. मी मेलो तरी चालेल पण आरक्षण मिळालंच पाहिजे. आता मोठे आंदोलन मुंबईत होणार आहे. मुंबईतले रस्ते साफ करा आम्ही येतोय. २० जानेवारी पासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी केली आहे. मुंबईला शांततेत जाण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. जो हिंसा करेल तो आपला नाही लक्षात ठेवा. जाताना कोठेही जाळपोळ करायची नाही. कुणालाही करू द्यायची नाही. शांततेची ताकद काय असते सरकारला दाखवून द्यायची आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. आता आरक्षण घेऊनच परत येणार आहे.
मराठा आंदोलनाचा कुणीही नेता नाही. मी देखील नाही. २० तारखेला तयारी करा. शांततेची आंदोलन होणार आहे. छगन भुजबळ म्हणजे बुजगावणं. भुजबळांनी शहाण व्हावं. आमच्या नादी लागू नका. मराठ्यांना अडवण सोपं नाही. मुंबईला जाण्याची तयारी करा.
मुंबईत १८ तारखेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आला आहे. २० तारखेला महाआंदोलन होणार असे जरांगे पाटील यांनी बीड येथील महाप्रलय सभेत जाहीर केले आहे.
Web Title: Maratha reservation, I will tell you, it’s been a long time…”, Jarange-Patal’s warning to Bhujbal
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App