Home महाराष्ट्र राज्य शासन- जरांगे पाटील यांच्यात वाढणार संघर्ष? आरक्षण समितीने मागितली दोन महिन्यांची...

राज्य शासन- जरांगे पाटील यांच्यात वाढणार संघर्ष? आरक्षण समितीने मागितली दोन महिन्यांची मुदतवाढ

Maratha Reservation:  संदीप शिंदे समितीने आपला अहवाल देण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ मागितली.

Maratha Reservation conflict will increase between the state government and Jarange Patil

मुंबई: मराठा आरक्षणाचा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे -पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला दिलेल्या मुदतीला अवघे तीन दिवस उरले असतानाच, आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या न्या. संदीप शिंदे समितीने आपला अहवाल देण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. समितीच्या या मागणीमुळे राज्य सरकार आणि जरांगे-पाटील यांच्यातील संघर्ष वाढून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चिघळणार का?  हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे.

विशेषत्वे, आरक्षणासंबंधीच्या समितीने मागितलेली मुदतवाढ आणि दुसरीकडे राज्य सरकारला आरक्षणासाठीची दिलेल्या मुदतीचे उरलेले तीन दिवस हे पाहता शासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सरकार आता नेमकेपणाने यातून कसा ‘सुवर्ण’मध्य काढणार? राज्यातील सकल मराठ्यांचे नेतृत्व करणारे जरांगे-पाटील कोणती भूमिका घेणार? हे पाहणे आता अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या न्या. संदीप शिंदे समितीने काही पुरावे गोळा करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. तथापि, सरकारने समितीला वेळ देण्यासंदर्भात अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

मात्र, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर समिती स्थापन करताना मराठा आरक्षणाचे मुख्य प्रवर्तक मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे ४० दिवसांची मुदत घेतली आहे. ती मुदत २४ तारखेला संपत आहे. ही मुदत संपण्यादरम्यानच समितीने तब्बल दोन महिन्यांची मुदतवाढ मागितल्याने मराठा आरक्षणावर रान पुन्हा पेटले जाऊ शकते.

जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्यावर ठाम आहेत. आरक्षणासाठीची समिती, तिचा अहवाल, आयोग वगैरे आम्हाला काहीच माहिती नाही मराठा आरक्षण द्या, ते घेण्यासाठी एक इंचदेखील मागे हटणार नाही, ही त्यांची भूमिका आहे. २४ तारखेपर्यंत शासनाला दिलेली मुदत आहे, तोपर्यंत काही बोलायचे नाही, त्यानंतर बघू. शांततेत सुरु केलेल्या मराठा आंदोलनाची दखल सरकारला घेणे भाग पडेल, असे जरांगे-पाटील म्हणताहेत.

ऐतिहासिक सभेचा टप्पा पार पडल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांना पुन्हा राज्यभरात सभा घेण्याचा सिलसिला चालू ठेवलाय. या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. राज्यभरात मराठा आरक्षणाचे झंझावती वादळ घोंघावत आहे. शिवाय प्रसारमाध्यमांमध्ये जरांगेंच्या मुलाखती प्रचंड गाजताहेत. मराठा समाज आत्महत्या करीत आहे. आरक्षणासाठी वातावरण चांगलेच पेटले आहे.

Web Title: Maratha Reservation conflict will increase between the state government and Jarange Patil

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here