Home अहमदनगर Manoj Patil: अहमदनगर जिल्ह्यात मनोज पाटील नवे पोलीस अधीक्षक

Manoj Patil: अहमदनगर जिल्ह्यात मनोज पाटील नवे पोलीस अधीक्षक

Manoj Patil is the new S P in Ahmednagar

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात अवघ्या पाच महिन्यात पोलीस अधीक्षकाची बदली झाली आहे. अखिलेश कुमार सिंह यांनी एप्रिल महिन्यात पदभार स्वीकारला होता. आता पुन्हा अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत नवीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे नगरचे पदभार स्वीकारणार आहेत.

शासनाने अधीक्षक बदली केली असून सोलापूर येथील मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिलेश कुमार सिंह यांना अजून बदलीचे ठिकाण दिले नसून त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे.

गुरुवारी शासनाने पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. येणाऱ्या दोन दिवसांत मनोज पाटील नगरचे पोलीस अधीक्षक पद स्वीकारणार असल्याचे समजते.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Manoj Patil is the new S P in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here