Accident: धर्मवीर निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात
Mangesh Desai Car Accident: कर्जतला जात असताना त्यांच्या कारला अपघात.
Mangesh Desai: अभिनेते, निर्माते मंगेश देसाई यांच्या गाडीचा नवी मुंबईत अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कर्जतला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
अभिनेता, निर्माता मंगेश देसाई गेल्या अनेक दिवसांपासून ‘धर्मवीर या सिनेमामुळे चर्चेत आहे.. कर्जतला जात असताना मंगेशच्या कारला अपघात झाला आहे.
मंगेश देसाई कुटुंबासोबत कर्जत येथे जात असताताना वाशी, कोकण भवन परिसरात कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. परंतु गाडीचे नुकसान झाले आहे. गाडीचे नुकसान झाल्याने मंगेश देसाईला आर्थिक फटका बसला आहे. मंगेश देसाई म्हणाला, मला आणि कुटुंबाला कोणतीही दुखापत झालेली नाही. गाडीचे थोडे नुकसान झाले आहे. अपघात झाला असला तरी काळजी करण्याचे कारण नाही असं त्यांनी म्हंटले आहे. .
नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रंगभूषा कलाकाराच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत करण्यात आली होती. यासाठी मंगेश देसाईनेच पुढाकार घेतला होता.
Web Title: Mangesh Desai Car Accident