Home अहमदनगर देवी समोरील मंडपाला विद्युत रोषणाई, विजेचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू

देवी समोरील मंडपाला विद्युत रोषणाई, विजेचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू

Ahmednagar | Shevgaon News: आठ वर्षीय मुलीचा मृत्यू, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; एकाला अटक (electric shock Accident).

mandap in front of the goddess was electrified, the child died due to an electric shock

शेवगाव: तालुक्यातील बोधेगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टी येथे दुर्गा देवीची स्थापना करून देवी समोरील मंडपाला विद्युत रोषणाई केलेली आहे. या मंडपाच्या लोखंडी पाईपमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला चिकटून निकीता काळुराम मोरे या आठ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरील घटना बोधेगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टी येथे शुक्रवारी (दि.२०) घडली आहे.

याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात देवीची स्थापना करणारा देवीचा भगत बाळू रमेश पाटोळे याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

याबाबत मुलीचे वडील काळुराम विष्णू मोरे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. निकीता मोरे ही बोधेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग तिसरीत शिकत होती. बाळू पाटोळे याने त्याचे घरी दुर्गा देवीची स्थापना केली आहे. त्याठिकाणी मंडप टाकला असून त्या मंडपाला लाईटच्या माळाचे डेकोरेशन केले आहे. त्याठिकाणी शेजारील लहान मुले खेळण्यासाठी जात होती. ही घटना घडण्याच्या अगोदर सुरज लखन धोत्रे याला गुरुवारी (दि.१९) रात्री साडेसात वाजता देवीची आरती चालू असताना लोखंडी पाईपचा शॉक लागला होता. त्याबाबत त्याने बाळू पाटोळे याला इलेक्ट्रिक लाईटिंग दुरुस्त करण्याबाबत सांगितले होते. मात्र त्याने दुर्लक्ष केले. बाळू पाटोळे हा निकीता हिच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने पोलिसांनी त्याचे विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

आरोपीस न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे सहायक फौजदार भास्कर गावंडे याठिकाणी राहणारा देवीचा भगत करीत आहेत.

Web Title: mandap in front of the goddess was electrified, the child died due to an electric shock

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here