खळबळजनक! लघुउद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या
Breaking News | Crime: एका लघुउद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या (Shot Dead) केल्याची घटना.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुज एमआयडीसी परिसरात साजापूर परिसरात एका लघुउद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे.
या हल्ल्यानंतर मारेकरी दुचाकीनं अंधाराचा फायदा घेत धुळे सोलापूर महामार्गावरुन पसार झाले. ही घटना रात्री वाळुज एमआयडीसी परिसरातील साजापूर परिसरातील बालाजी नगरात घडली. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडालीय.
सचिन साहेबराव नरोडे असं हत्या झालेल्या लघुउद्योजकाचं नाव आहे. हे मारेकरी त्याच्या ओळखीचे असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि पोलीस उपायुक्त नितीन बगाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Small businessman was shot dead in the head
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study