Home Accident News दुचाकी घसरल्याने टँकरने चिरडले; , नगर रस्त्यावर भीषण अपघात एकाचा मृत्यू

दुचाकी घसरल्याने टँकरने चिरडले; , नगर रस्त्यावर भीषण अपघात एकाचा मृत्यू

Breaking News | Pune Accident: नगर रस्त्यावर टँकरच्या धडकेत अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना.

Tanker crushed the bike as it slipped , One died in a terrible accident on the city road

पुणे : नगर रस्त्यावर टँकरच्या धडकेत अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वारासह दोघे जखमी झाले. याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र तुकाराम बोंडे (४६, रा. गणेशननगर, वडगाव शेरी) असे मृत्यू झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सुनील किसन मांगले (४२, रा. अष्टविनायक सोसायटी, वडगाव शेरी), सूरज सदाशिव पाटील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांगले यांनी याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीवरून तिघे नगर रस्त्याने निघाले होते. वाघोली-केसनंद रस्त्यावर कोणार्क ऑर्चिड सोसायटीसमोर अचानक पादचारी आडवा आला. पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराने ब्रेक दाबला. दुचाकी घसरल्याने तिघेजण रस्त्यात पडले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टँकरने मांगले, बोंडे, पाटील यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बोंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस कर्मचारी कर्णेवर अधिक तपास करत आहेत.

Web Title: Tanker crushed the bike as it slipped , One died in a terrible accident on the city road

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here