Home महाराष्ट्र शाळांबाबत मोठी बातमी! शिक्षण मंत्र्यांचा नेमका काय प्रस्ताव?

शाळांबाबत मोठी बातमी! शिक्षण मंत्र्यांचा नेमका काय प्रस्ताव?

Maharashtra School start decision

मुंबई | Maharashtra School: येत्या सोमवारपासून शाळा सुरु केल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन वर्ग बंद केले होते.  दरम्यान, आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिला आहे.  मोठ्या प्रमाणात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याची मागणी होतेय. ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल, त्याभागातील त्या ठिकाणाचे स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जावा. तसे अधिकार दिले जावे, याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे, असं वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणं, शिक्षकांच्या दोन्ही लसी पूर्ण करणं, या गोष्टीवरही भर देण्याचा प्रयत्न प्रस्तावातून देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार दिले जावेत, असा प्रस्ताव देण्यात आला आहेत. या प्रस्तावावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Web Title: Maharashtra School start decision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here