Maharashtra Lockdown Updates: महाराष्ट्रात १ जून पर्यंत कडक निर्बंध, काय होणार सुरु आणि बंद
Maharashtra Lockdown Updates: महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन कालावधी १ जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे. असे परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले आहे. ब्रेक ड चैन चे निर्बंध १ जून ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकोरमायकोसिस वाढते रुग्ण पार्शभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
काल मुख्यमंत्री घोषणा करणार असे म्हंटले जात होते मात्र लॉकडाऊन वाढविण्याबाबत निर्णय जारी करण्यात आला आहे. ३१ मे पर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. मागील निर्बंधामध्ये काही बदल होतात का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. जे मागील निर्बंध आहेत तेच सध्या पुढे सुरु राहणार आहे, ज्या पद्धतीने दुध, किराणा , फळभाज्यासाठी जे नियम आहेत त्याच पद्धतीने ते सुरु रहाणार आहे. अगोदरचे जे निर्बंध आहेत तेच सुरु राहणार आहे.
तसेच परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीस आरटीपीसीआर बंधनकारक करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेले जे अधिकार आहेत ते त्याच पद्धतीने असणार आहे. जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात.
Web Title: Maharashtra Lockdown increased till 1 Jun