राष्ट्रवादी कॉंग्रेस संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर
Maharashtra Cabinet Expansion | NCP Ajit Pawar Cabinet Minister List: महायुतीच्या पहिल्या विस्तारात तब्बल ३५ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. साहजिकच भाजपचे सर्वात जास्त आमदार असणार आहेत.
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (15 डिसेंबर) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्या दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
याचदरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस संभाव्य मंत्र्याची यादी समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस : छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, नरहरी झिरवळ, मकरंद पाटील, दत्तात्रेय भरणे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, सना मलिक यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
Web Title: Maharashtra Cabinet Expansion | NCP Ajit Pawar Cabinet Minister List
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study