हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं’, राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
Maharashtra Assembly Election 2024| Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat: संगमनेर विधानसभेत उमेदवार कोण हे पाहू नका. वसंतराव देशमुख यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही. त्याचा निषेध मी केलाय. मात्र पंधरा मिनिटात मारणारे कसे जमा होतात? हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न.
संगमनेर : भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात) यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 12 तास ठिय्या मांडला होता. वसंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये मेळावा घेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधलाय.
उमेदवार कोणताही असो युती म्हणून भूमिका घ्या. दहशतवादाविरोधात आपली लढाई आहे. संगमनेर विधानसभेत उमेदवार कोण हे पाहू नका. वसंतराव देशमुख यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही. त्याचा निषेध मी केलाय. मात्र पंधरा मिनिटात मारणारे कसे जमा होतात? हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुजय विखेच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर केली.
Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Radhakrishna Vikhe Patil
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study