नात्यातील मुलीवर जडले प्रेम, तरुणाने तरुणीसोबत भयानक कृत्य
Nashik Crime: प्रेमात ठिणगी पडली आणि यातून भरदिवसा मुलीवार प्राणघातक हल्ला केल्याची घटना.
नाशिक: नात्यात असलेल्या मुलीवर तरुणाचे प्रेम जडले. या प्रेमात ठिणगी पडली आणि यातून भरदिवसा मुलीवार प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. नात्यातीलाचा तरुणाने कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्लब) एका तरुणीवर एका मुलाने भरदिवसा प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. हल्ला करणाऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून तरुणीवर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप या हल्ल्यामागचे कारण स्पष्टपणे समजू शकलेले नाही. तर हल्ला केल्यानंतर उपस्थित नागरिकांनी या मुलाला चांगलाच चोप दिला.
दरम्यान, याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तसेच या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे.
Web Title: love with a girl in a relationship, a young man commits a terrible act with a young woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News, Aj Smart News