Home अमरावती प्रेमाचा त्रिकोण, प्रेयासिकडून प्रियकराच्या मैत्रिणीचा भोसकून खून

प्रेमाचा त्रिकोण, प्रेयासिकडून प्रियकराच्या मैत्रिणीचा भोसकून खून

Breaking News | Amravati Crime: प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणीने दुसऱ्या तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. (Love triangle Murder)

Love triangle, lover stabbing lover's girlfriend

अमरावती:  प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणीने दुसऱ्या तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा  धक्कादायक प्रकार  मंगळवारी (दि. ८) रात्री आठच्या दरम्यान अमरावतीत राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुपर एक्सप्रेस हायवेवर असलेल्या एका मंदिराजवळ घडली. तरुणीवर चाकूने वार केल्यानंतर मारेकरी तरुणी फरार झाली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहे. शुभांगी काळे (वय 26, रा. आर्वी, जिल्हा वर्धा) असे मयत तरुणीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , शुभांगीच्या परिचयातील तरुणाचे एका दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत. याच तरुणाचे शुभांगीसोबत देखील प्रेम संबंध असल्याचा संशय त्याच्या प्रेयसीला होता. यावरून दोघांमध्ये वादही झाला होता. त्यामुळे तरुणाने आपल्या प्रेयसीची भेट शुभांगी सोबत करून देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मंगळवारी शुभांगी ही एका मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाकरिता अमरावतीत आली होती. त्यामुळे तरुणाने आपल्या प्रेयसीची शुभांगी सोबत भेट करून देण्यासाठी रात्री आठ वाजताच्या सुमारास तिला सुपर एक्सप्रेस हायवेवरील एका मंदिराजवळ बोलाविले. शुभांगी तेथे पोहोचल्यावर तरुणाच्या प्रेयसीने तिच्यासोबत वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, शुभांगीवर दुसऱ्या तरुणीने चाकूने हल्ला चढविला आणि त्यानंतर तेथून निघून गेली.

यात शुभांगी गंभीर जखमी झाली. त्यामुळे तरुणाने शुभांगीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी आपल्या पथकासह जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामाही केला. याप्रकरणी फरार असलेल्या तरुणीचा पोलीस शोध घेत असून प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून विचारपूस केली जात आहे. प्राथमिक तपासात शुभांगीची हत्या त्रिकोणी प्रेम प्रकरणातून झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. संशयित आरोपी तरुणीने शुभांगीच्या मानेवर, हातावर आणि छातीवर चाकूने वार केले होते. तिच्या हृदयाला देखील घाव लागले होते. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू (Death) झाला होता. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Love triangle, lover stabbing lover’s girlfriend

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here