धक्कादायक! शाळकरी मुलीजवळ प्रेमाचं सूत जुळलं; मुलाने अत्याचार, मुलगी दोन महिन्यांची गर्भवती
Thane Crime: अल्पवयीन १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर १६ वर्षीय मुलाने अत्याचार.
ठाणे: ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर १६ वर्षीय मुलाने अत्याचार केला. यात पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. ४) उघडकीस आला आहे. याप्रकरणी शीळ डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन १४ वर्षीय पीडित मुलगी ही शीळ डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असून ती एका शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी अल्पवीयन विद्यार्थी हा त्याच परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यापासून दोघांमध्ये ओळख होऊन मैत्री झाली. नंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर नेहमीच शाळा-महाविद्यालयात जाण्याच्या बाहण्याने ते दोघे एकमेकांना भेटत होते. दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थाने पीडित शाळकरी मुलीवर अत्याचार केला. काही दिवसांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागले. उपचारासाठी तिला कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले असता, पीडित मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले. दरम्यान, पीडित शाळकरी मुलीच्या तक्रारीवरून ४ ऑगस्ट रोजी त्या अल्पवयीन विद्यार्थांवर अत्याचार आणि पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी करत आहे.
Web Title: love met with a Schoolgirl Abused by a boy, a girl two Months Pregnant
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App