Home संगमनेर संगमनेर: ‘लव्ह जिहाद’ पाच वर्षापासून प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार , चौघांवर गुन्हा

संगमनेर: ‘लव्ह जिहाद’ पाच वर्षापासून प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार , चौघांवर गुन्हा

Breaking News | Sangamner: तब्बल पाच वर्षांपासून पीडित तरुणीला प्रेमाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि त्यानंतर फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी नेत बळजबरीने लग्न आणि धर्मांतर करुन अत्याचार केल्याचे जबाबातून समोर.

'Love Jihad' torture has been dragged into the web of love for five years

संगमनेर:  तालुक्याच्या पठारभागात घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील म्होरक्यासह चौघांवर घारगाव पोलिसांनी  पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करत गजाआड केले आहे. तब्बल पाच वर्षांपासून पीडित तरुणीला प्रेमाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि त्यानंतर फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी नेत बळजबरीने लग्न आणि धर्मांतर करुन अत्याचार केल्याचे जबाबातून समोर आले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही मुख्य आरोपी शादाब तांबोळी याने सन 2020 पासून यूसुफ चौघुले, कुणाल शिरोळे यांच्या मदतीने वेळोवेळी पाठलाग करुन प्रेमाचे आमिष दाखवत सलगी केली. याचा फायदा उठवून तांबोळी व चौघुले या दोघांनी पीडित तरुणीला फसवून मंचर (पुणे) येथे बोलावले. त्यानंतर चौघुले याच्या कारमधून मंचरवरुन लग्नासाठी चाकण येथे नेले. यासाठी तिला पाण्यातून काहीतरी गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले. यावरच त्यांचा कारनामा थांबला नाही. त्यांनी तेथून पुन्हा दुसर्‍या वाहनाने मुंबईला पाठवून दिले.

मुंबईत आल्यावर येथील अयाज पठाण याने सतत धमकावून तांबोळी आणि पीडित तरुणीला लॉजवर पाठवून दिले. तेथे तांबोळी हा तिला फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या घरच्यांना संपवून टाकेल अशी धमकी देऊन अत्याचार केले. विशेष म्हणजे तिला न सांगता बळजबरीने लग्नाच्या व धर्मांतराच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्याचे पीडितेने जबाबात सांगितले. यावरुन घारगाव पोलिसांनी मुख्य आरेापी शादाब तांबोळी, सूत्रधार यूसुफ चौघुले, कुणाल शिरोळे व अयाज पठाण यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहे.

दरम्यान, यातील म्होरक्या यूसुफ चौघुले याचा पोलीस कसून शोध घेत होते. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने श्रीरामपूर येथून अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: ‘Love Jihad’ torture has been dragged into the web of love for five years

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here