Accident: बोलेरो आणि कारचा भीषण अपघात, चार जण जखमी
राहता | Accident: राहता तालुक्यातील लोणी खुर्द गावाजवळ तळेगाव रस्त्यावर बोलेरो आणि कारचा भीषण अपघात घडला. यामध्ये चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोलेरो गाडी ही लोणी बुद्रुक येथील असून ती लोणी खुर्द येथील स्मशान भूमी जवळून लोणी बुद्रुककडे जाण्यासाठी वळण्याचा मार्ग निवडला असता पाठीमागून आलेल्या कारने पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात कार चालक व त्याचा सहकारी हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून ते लोणी खुर्द येथील असल्याचे समजते. तर बोलेरो मधील दोघे जण लोणी बुद्रुक येथील असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताच्या वेळी जखमींना काचा व दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आले आहे. या जखमींवर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Web Title: Loni Road Bolero and car Accident