Home अहमदनगर खासदार लोखंडे यांच्या घरात घुसून शिवीगाळ व धक्काबुक्की

खासदार लोखंडे यांच्या घरात घुसून शिवीगाळ व धक्काबुक्की

Lokhande's house was entered and abused crime Filed

शिर्डी | Crime: शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उंबरगाव ता. श्रीरामपूर येथील बंगल्यात अनधिकृत प्रवेश करून वाचमन व अंगरक्षकास शिवीगाळ व धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे. या आरोपावरून उदय लिप्टेसह चार अनोळखी व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्याद सदाशिव लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल विनोद वसंतराव उंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उंबरगाव येथील साई खेमानंद फाउंडेशन ट्रस्ट येथे उदय शिवाजी लिप्टे व इतर चार इसम हे दोन मोटारसायकलवर आले. त्यांनी लाथाबुक्क्यांनी बंगल्याचे गेट उघडले. याबाबत तेथील वाचमन निलेश शिंदे यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

अनाधिकाराने आत प्रवेश करून आतमध्ये असलेल्या गाड्यांचे पान कापड फाडून गाड्यांचे व्हिडियो शुटींग केले. खासदार लोखंडे यांच्या निवासस्थानाकडे प्रवेश करत असताना त्यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल उंडे यांनी त्यांना मज्जाव केला असता त्यानांही उदय लिप्टेसह त्याच्या साथीदारांनी धक्काबुक्की केली असे फिर्यादीत म्हंटले आहे.    

खासदार लोखंडे यांनी निवडणुकीच्या प्रचारसाठी दोन वाहने वापरली होती. ही वाहने त्यांच्या बंगल्यात उभी होती. आरोपी उदय याने कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका म्हणून या वाहनाचा वापर करावा अशी मागणी करत बुधवारी राडा केला होता असे तपासी अधिकारी घायवट म्हणाले.  

Web Title: Lokhande’s house was entered and abused crime Filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here