Home अहमदनगर लोकसभा निवडणूक : नगरमधून ४३, तर शिर्डीतून ३१ उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणूक : नगरमधून ४३, तर शिर्डीतून ३१ उमेदवारी अर्ज दाखल

Breaking News | Ahmednagar: लोकसभा निवडणूक : नगरमधून ४३, तर शिर्डीतून ३१ उमेदवारी अर्ज दाखल. दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जाची छाननी आज सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार

Lok Sabha Election 43 nominations filed from Nagar, 31 from Shirdi

अहमदनगर : नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ दिसून आली. शेवटच्या दिवशी नगरमधून २७ उमेदवारांनी ३२ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत, अशा प्रकारे नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या ४३ एवढी झाली आहे. शिर्डीमधून ३९ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जाची छाननी आज सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल सायंकाळी ३:०० वाजेपर्यंत आहे. त्यानंतर अर्जात नमूद केलेल्या चिन्ह वाटप केले जाईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

उमेदवार – डॉ. सुजय विखे (भाजप), नीलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार), राणी लंके (अपक्ष), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार), महेंद्र शिंदे (वंचित बहुजन आघाडी), उमाशंकर यादव (बहुजन समाज पार्टी), प्रा. सुनीलराव पाखरे (भाजप), दिलीप खेडकर (वंचित बहुजन आघाडी), गिरीश जाधव (अपक्ष), सूर्यभान लांबे (अपक्ष), जहीर जकाते (अपक्ष), शिवाजीराव डमाळे (सैनिक समाज पार्टी), कलीराम पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), सुदर्शन शितोळे (हिंदू एकता आंदोलन पार्टी), शेकटकर अनिल (अपक्ष), मुक्ता साळुंके (इंन्सालनियत पार्टी), मदन सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी), आरती हालदार (प्रबुद्ध रिपब्लीदकन पार्टी), रावसाहेब काळे (बहुजन मुक्ती पार्टी), गंगाधर कोळेकर (अपक्ष), प्रवीण दळवी (अपक्ष), मनोरमा खेडकर (अपक्ष), बिलाल शेख (अपक्ष), प्रतीक बारसे (अपक्ष), परवेज शेख (ऑल इंडिया मजलिस इत्तेफहादुल मुस्लिमीन), शेळके विश्वेनाथ (अपक्ष), ज्ञानदेव पाडळे (अपक्ष), शरद माघाडे (अपक्ष), हनुमंत पावणे (अपक्ष), डॉ. कैलाश जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी), भागवत गायकवाड (समता पार्टी), अॅड. महंमद शेख (अपक्ष), वाबळे भाऊसाहेब (भारतीय जवान किसान पार्टी), नवशाद शेख (अपक्ष), दत्तात्रय वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), कोठारी रवींद्र (अपक्ष), अमोल पाचुंदकर (अपक्ष), गावडे मच्छिंद्र (अपक्ष), पानसरे छगन (अपक्ष), नीलेश साहेबराव लंके (अपक्ष)

शिडी लोकसभा मतदारसंघ

उमेदवार – भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे), सदाशिव लोखंडे (शिवसेना), उत्कर्षा रूपवते (वंचित बहुजन आघाडी), चंद्रकांत दोंदे (अपक्ष), अभिजित पोटे (अपक्ष), भारत भोसले (समता पार्टी), नितीन पोळ (बहुजन भारत पार्टी), गोरक्ष बागुल (अपक्ष), अशोक वाकचौरे (अपक्ष), अॅड. सिद्धार्थ बोधक (अपक्ष), अशोक आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतीश पवार (अपक्ष), संजय भालेराव (अपक्ष), रामचंद्र जाधव (बहुजन समाज पार्टी), राजू खरात (बहुजन समाज पार्टी), गंगाधर कदम (अपक्ष), भाऊसाहेब वाकचौरे (अपक्ष), प्रशांत निकम (अपक्ष), नचिकेत खरात (अपक्ष), संजय खामकर (बळीराजा पार्टी), राजेंद्र वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), चंद्रहार जगताप (अपक्ष), रवींद्र स्वामी (अपक्ष), विजयकुमार खाजेकर (अपक्ष), सना सय्यद (अपक्ष), शंकर भारस्कर (अपक्ष), दिलीप गायकवाड (अपक्ष), डॉ. अशोक महांकाळे (अपक्ष), जयाबाई डोळस (अपक्ष), संतोष वैराळ (अपक्ष), सतीष सनदी (अपक्ष)

Web Title: Lok Sabha Election 43 nominations filed from Nagar, 31 from Shirdi

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here