Home महाराष्ट्र Lockdown: कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने राज्यात कडक निर्बंध लागू

Lockdown: कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने राज्यात कडक निर्बंध लागू

Lockdown Stricter restrictions will be imposed in Maharashtra

मुंबई | Lockdown : कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना संख्येची मर्यादा असणार आहे.

वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आलेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे आजपासूनच हे निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध लागू करण्यात आलेत. केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडावी लागणार आहे. अंत्यसंस्कारांना केवळ 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे.

पर्यटन स्थळं, समुद्र किनारे, गर्दी होणारी ठिकाणं अशा ठिकाणी निर्बंध लावण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेत. मात्र दुकानं, मॉल, सिनेमागृह यांविषयी अजून आदेश जारी झालेले नाहीत. राज्यात कोरोना रुग्णसंख्येचे आकडे रोजच वाढत आहेत. त्यामुळे सरकारने अखेर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान  राज्यात कोरोनाचा स्फोट, 24 तासांत 5 हजार 368 रुग्ण तर एकट्या मुंबईत तब्बल 3 हजार 928 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.  नेते, अभिनेते कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेते राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अभिनेत्री नोरा फतेही, अर्जून कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Web Title: Lockdown Stricter restrictions will be imposed in Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here