‘इन्स्टाग्राम’वर लाईव्ह येत तरुणीने घेतला गळफास, आत्महत्या केल्याने खळबळ
एका 22 वर्षीय परप्रांतीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर.
उस्मानाबाद: जिल्ह्यात एका 22 वर्षीय परप्रांतीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ‘इन्स्टाग्राम’वर लाईव्ह येत या तरुणीने गळफास घेतला. उमरगा तालुक्यातील जकेकूर चौरस्ता येथील अंबिका हॉटेलमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. या तरुणीने ‘इन्स्टाग्राम’वर लाईव्ह येत गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली असून, याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुरुवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.
यमत उर्फ राणी दोमन हासदा (वय 22 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, उमरगा शहरापासून जवळच असलेल्या जकेकूर चौरस्ता भागात अंबिका हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास झारखंड येथील रायमत उर्फ राणी दोमन हासदा (वय 22 वर्षे) या युवतीने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान ही घटना निदर्शनास येताच हॉटेल चालकाने याची माहिती उमरगा पोलिसांना दिली. तर याबाबत माहिती मिळताच अवघ्या काही क्षणातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरा शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह तरुणीच्या मूळ गावी झारखंडला पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी मयत तरुणीची मैत्रीण राधिका राजेश कश्यप (रा. दिल्ली) हिच्या तक्रारीवरुन उमरगा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मयत तरुणी परराज्यातील अंबिका हॉटेलवर कशासाठी आली होती, ती कधीपासून राहात होती, तिने आत्महत्या का केली, हे प्रश्न अद्याप समोर आले नाहीत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
Web Title: live on ‘Instagram’, causing excitement by committing suicide
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App