संगमनेर: हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Sangamner News: अल्पवयीन मुलीवर संगमनेर शहरातील एका हॉटेलमध्ये अत्याचार (Abused) केल्याची धक्कादायक घटना.
संगमनेर: अल्पवयीन मुलीवर संगमनेर शहरातील एका हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला असून हा प्रकार शनिवारी घडला आहे. या प्रकरणी पिडित मुलीने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.
गणेश सुखदेव भडांगे (रा. शेंडेवाडी, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. भडांगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीत म्हटले की, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी शालेय शिक्षण घेत असून तिला गणेश भडांगे याने दुचाकीवर बसविले, तो तिला संगमनेर शहरात घेऊन गेला सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास एका हॉटेलात तो तिला घेऊन गेला अन मुलीने त्याला विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली. मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी देत त्याने तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी भडांगे याला ताब्यात घेतले आहे. घारगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Minor girl abused in a hotel in Sangamner
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App