पिचड पिता-पुत्रांच्या प्रवेशामुळे भाजपला बळकटी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोले : ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड हे राज्यातील आदिवासी समाजाचे मोठे नेते आहेत. त्यांनी भाजपत प्रवेश केल्याने पक्षाला अधिक बळकटी व ताकद मिळेल. आ. वैभव हे सुद्धा पिचड यांचीच कार्बन कॉपी आहे. आ. वैभव हे आपले प्रश्न शांत, संयमाने सोडवून घेतात, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड व अकोलेचे आ. वैभवराव पिचड यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या समवेत आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. संदीप नाईक, आ. कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी पोलीस आयुक्त साहेबराव पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर आदींनी भाजपत प्रवेश केला.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ना. सुधीर मुनगंटीवार, ना. गिरीश महाजन, ना. राधाकृ ष्ण विखे पाटील, ना. राम शिंदे, ना. विनोद तावडे, ना. सुभाष देशमुख, खा. रणजितसिंह निंबाळकर, आ. मंदा म्हात्रे, मंगलप्रभात लोढा, मधू चव्हाण आदी उपस्थित होते. या सर्वांनी प्रवेश केलेल्या मान्यवरांचे पक्षात स्वागत केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोणी कितीही खोट्या अफवा पसरविल्या तरी सेना-भाजप व मित्रपक्ष यांची युती अभेद्य आहे. मराठवाड्याच्या मागील पिढीने दुष्काळ पाहिला आहे. मात्र, आता दुसरी पिढी तो पाहणार नाही. म्हणूनच कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत समुद्रात वाहून जाणारे १६२ टीएमसी पाणी मराठवाड्यात वळवून मराठवाडा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचे प्रवेश हे पदाकरिता नसून मतदारसंघातील प्रश्न सोडवून घेण्यासाठीच्या बांधिलकीतून असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यांच्यावर कारवाई सुरू आहे, अशांना पक्षात घेण्यासाठी भाजप परिवार म्हणजे काही धर्मशाळा नाही. कार्यकर्त्याचे नेतृत्व व कर्तृत्व पाहूनच त्याला पक्षात प्रवेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षप्रवेश करणाऱ्यांमधील प्रातिनिधीक स्वरुपात ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी मनोगत व्यक्त केले.
पिचड म्हणाले, आपण वयाची ७९ वर्षे पार केली असून महाराष्ट्र व तालुक्यातील जनतेने खूप प्रेम दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम चांगले आहे. देश व राज्य ज्या बाजूने चालला आहे त्या बाजूने गेले पाहिजे. म्हणून आपण पक्षात प्रवेश केला असल्याचेही पिचड यांनी सांगितले. प्रास्ताविकात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, छगन भुजबळ, गणेश नाईक यांना राष्ट्रवादीने फोडले तेव्हा राष्ट्रवादीच्या दृष्टीने ते योग्य होते. इतर पक्षातील नेते आमच्या पक्षात येतात तेव्हा त्यांना ईडीची चौकशी किंवा धमकावले गेले, असे शरद पवार यांना वाटते. मधुकरराव पिचड, आ. शिवेंद्रराजे भोसले यांना कसली आली ईडीची भीती? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. ना. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात २ हजार ३३८ राजकीय पक्षांची नोंदणी झालेली आहे. बाकीचे पक्ष हे खासगी कंपन्या आहेत, तर भाजप हा पक्ष नव्हे तर एक परिवार आहे. नगर जिल्ह्यात शिर्डीत साई आहे, राम आहे. राधाकृ ष्णही आलेत. आता नगर जिल्ह्याचे वैभव वाढविण्यासाठी आ. वैभव पिचड हेही दाखल झाले. भाजप परिवारामध्ये व्यक्ती पाहून नव्हे तर त्यांचे कर्तृत्व पाहून पद दिले जाते, असेही ते म्हणाले.
या पक्षप्रवेश सोहळ्यास राजूरच्या सरपंच सौ. हेमलताताई पिचड, जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, भाजपचे जि. प.मधील गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, मीनानाथ पांडे, गिरजाजी जाधव, अशोकराव देशमुख, ॲड. के. डी. धुमाळ, परबतराव नाईकवाडी, जि. प. सदस्य रमेशराव देशमुख, माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, रावसाहेब वाकचौरे, जे. डी. आंबरे, विठ्ठलराव चासकर, यशवंतराव आभाळे, राजेंद्र डावरे, गोरख मालुंजकर, भाऊपाटील नवले, राजेंद्र देशमुख, अर्जुन गावडे, शंभू नेहे, विक्रम नवले, संतोष शेळके, बाळासाहेब ढोले, विजय भांगरे, इंजि. सुनील दातीर, साईनाथ नवले, सचिन जगताप, विक्रम आरोटे, भरत वाकचौरे, संतोष नवले, बाळासाहेब नवले, गोकुळ कानकाटे, राजू कानकाटे, संतोष बनसोडे, नितीन गोडसे, राजेंद्र गोडसे, मनोज देशमुख, प्रवीण झोळेकर, प्रवीण धुमाळ, राम तळेकर, नरेंद्र नवले, भाऊसाहेब वाकचौरे, ईश्वर वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, प्रकाश कोरडे, नीलेश चौधरी, विजय पवार, बी. सी. भांगरे, माधव गभाले, मदन आंबरे, रमेश पवार, बादशहा एखंडे, गणपत मोरे, शरद चौधरी, राजाराम राऊत, बाळासाहेब साबळे, नीलेश गायकर, राजेंद्र गवांदे, आशाताई पापळ, कल्पनाताई सुरपुरीया, चंद्रकला धुमाळ, माधवी जगधने, सोनालीताई नाईकवाडी यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन अतुल भातकळकर यांनी केले.
Website Titel: Letest News BJP Strengthened By The Admission Of Pitched Fathers – Chief Minister Devendra Fadnavis