Home अकोले अकोले : गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी देवठाण येथे रास्ता रोको आंदोलन

अकोले : गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी देवठाण येथे रास्ता रोको आंदोलन

अकोले : देवठाण येथील सभामंडपाच्या बांधकामातील भ्रष्टाचार, ग्रामपंचायतीच्या हरवलेल्या दप्तराचा शोध लावणे, तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवणे, ग्रामसेवकाने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी आदी मागण्यांसाठी देवठाण येथे गुरुवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या ठोस आश्वासनामुळे दोन तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे सिन्नर, नाशिक व अकोले येथे जाणाऱ्या वाहनांची दोन तास कोंडी झाली. 
देवठाणचे माजी सरपंच एकनाथ सहाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी पं. स. सदस्य अरुण शेळके, अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे, कम्युनिष्ठ नेते तुळशीराम कातोरे, अरुण शेळके, शिवाजी पाटोळे, तुळशीराम कातोरे, अजय शेळके, भारत सहाणे, केशव बोडके, बाळू गायकवाड, किसन काकड, सुभाष सहाणे, तुकाराम काळे सहभागी झाले. सभामंडपाच्या कामातील भ्रष्टाचार, हरवलेले दप्तर व तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने झालेल्या भाषणातून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न व चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. 
संजय बोडके, सुभाष काकड, अशोक पथवे, ग्रामसेवक दौलत नवले, तलाठी बाळकृष्ण साळवे, उपसरपंच किसन काकड, विस्तार अधिकारी बी. टी. सरोदे, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता पी. एन. वाकचौरे, हेड कॉन्टेबल बन्सी टोपले यावेळी उपस्थित होते. 
गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Website Titel: Letest News Akole: Rasta Roko Agitation In Devathan For Investigation Of Misconduct

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here