Home अकोले अकोलेत तरुणाची कर्जाला कंटाळून आत्महत्या

अकोलेत तरुणाची कर्जाला कंटाळून आत्महत्या

अकोले: अकोले तालुक्यातील लिंगदेव या गावातील तरुण गणेश लहानू फाफाळे याने स्थानिक पतसंस्थेच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. हा तरुण पुणे जिल्हयातील खेड येथे राहत होता. गणेश हा शेतकरी कुटुंबांतील आहे.

शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्याने आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी पुणे येथे काम करत होता. त्यात आता लॉकडाऊन झाल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत होते.

वाचा: नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर शहरातील दुकान सील

दिवसेंदिवस घरच्या कर्जाचा फुगवटा वाढतच होता. पतसंस्थेच्या असलेल्या अव्वाच्या सव्वा व्याजदराने दहा चे दहा हजार होत चालले होते. शेतमालाला बाजारभाव नाही. यातच बेरोजगारी ओढवलेले संकट व त्यातच कर्जाच्या झालेल्या डोंगराने गणेश हतबल झाला होता. नाईलाजणे हतबल झालेल्या गणेशला आपली जीवनयात्रा संपविण्याची वेळ आली.

वाचा: घाटकोपरहून नगरला आलेल्या महिलेला करोनाची लागण

या झालेल्या प्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यासारख्या प्रकरणाने तालुक्यात अनेकांना हतबल होऊन जीवनयात्रा संपवावी लागली आहे.

Website Title: Latest news Young man commits suicide in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here