संगमनेरात भाजीपाल्याच्या नावाखाली मांस घेऊन जाणारी वाहने पकडली
संगमनेर: लॉकडाऊन सुरु असताना संगमनेरमधून मुंबईकडे मांस घेऊन जाणारी ३ वाहने पोलिसांनी पकडली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वावी पोलिसांनी या तीन वाहनांतून सुमारे २ टन मांस जप्त करून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरात लॉकडाऊन असतानाही कत्तलखाने सुरु असल्याचे समोर आले आहे.
सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे शिवारात नाकाबंदी दरम्यान ९ एर्प्रिलला संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अझरूद्दीन जमालुद्दीन शेख (वय २७), अहसान मोहम्मद कुरेशी (वय २२) (दोघेही रा. कुर्ला पूर्व, मुंबई) हे टेम्पोतून मुंबईकडे गोमांस घेऊन चालले होते. हा टेम्पो पोलिसांनी पकडून त्यातील पाच लाख ४८ हजार रुपये किंमतीचे ५ हजार ४८० किलो मांस व तीन लाख ५० हजार रूपयांचा टेम्पो असा एकूण आठ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाबाबत पोलीस उपनिरीक्षक अभय मुरलीधर ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे.
तसेच १३ एप्रिलला रात्री १०:४५ च्या सुमारास मोहमद युनूस याकुब कुरेशी (वय ४२), महेशकुमार जयदेवप्रसाद शर्मा (वय २६) (दोघेही रा. कुरेशी नगर, कुर्ला, मुंबई) हे मालवाहू ट्रकमधून मुंबईकडे मांस घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना पकडून ट्रकमधील दहा लाख रुपये किंमतीचे दहा हजार किलो मांस व दहा लाखांचा टेम्पो असा एकूण वीस लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाबाबत पोलीस शिपाई विठ्ठल रामनाथ पवार यांनी फिर्याद दिली आहे.
१४ एप्रिलला रात्री ९:१५ च्या सुमारास इक्बाल अब्दुल रहमान खान (वय २९, रा. इंदिरानगर, कुर्ला पुर्व, मुंबई) अहेसान मोहमद कुरेशी (वय २२, कुर्ला, मुंबई) हे दोघे टेम्पोतून मुंबईकडे मांस घेऊन जात होते त्यावेळी त्यांना पोलिसांनी पकडले. त्यातील पाच लाख रुपये किंमतीचे पाच हजार किलो मांस व चार लाख ५० हजार रुपये किंमतीचा टेम्पो असा एकूण ९ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाबाबत पोलीस शिपाई सुधाकर शंकर चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
संगमनेरमध्ये गोवंशाचे प्रमुख केंद्र असलेल्या कत्तलखाने सुरू असल्याचे समोर आले आहे. जिथे करोना संशियीत आणि बाधित आहेत तेथूनच हा बेसुमार उद्योग चालू आहेत. संगमनेरमधून मांस मुंबईकडे जात असताना संगमनेर पोलिसांच्या लक्षात ही बाब का आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Website Title: Latest News Vehicles carrying meat were seized