अकोले (प्रतिनिधी): पुणे येथे वीर मराठा महासंघाच्या झालेली बैठकीत वीर मराठा महासंघाची नगर जिल्ह्याची कार्यकारिणी संस्थापक, राज्य प्रदेश अध्यक्ष प्रशांत भोसले , महिला राज्य प्रदेश अध्यक्ष छाया ताई भगत, संस्थापक राज्य कार्याध्यक्ष शेखर पाटील ,ह्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.यावेळी अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी संतोष काळाने,अहमदनगर संघटक पदी अशोक कारभारी उगले,अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदी महेश सोनवणे,उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष पदी जालिंदर बोडके, जिल्हा उपाध्यक्ष पदी भूषण वाकचौरे ह्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली त्यावेळी राज्याध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ ह्यांनी सर्वांचे अभिनंदन करून,पुढील कार्यास शुभेच्या दिल्या. तसेच अकोले तालुक्यातील लवकरच नवीन कार्यकारणी होणार असून लवकरच प्रत्येक गावात संघटनेची शाखा स्थापन करून मराठा समाजाचे संघटन करून संपूर्ण जिल्ह्यात मोठा परिवार निर्माण करणे असा निर्धार करण्यात आला.
या निवडीने अकोले तालुक्यातून तसेच आढळा विभागातून या निवडीचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Website Title: Latest News veer Maratha meeting