भंडारदरा: मद्यपी पर्यटकांचा स्थानिकांवर चाकू हल्ला, चार जखमी
राजूर | latest News: शेंडी भंडारदरा परिसरात मद्यपी पर्यटकांनी स्थानिक नागरिकांवर चाकू हल्ला केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत. यामधील एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत असलेले दोघे जण फरार झाले आहे. एकाच महिन्यादरम्यान मद्यपी पर्यटकांची स्थानिकांवर हल्ला करण्याची ही तिसरी वेळ आहे. या घटनेने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शेंडी येथील हॉटेल पंचशीलसमोर चौकात तीन मद्यधुंद पर्यटक आणि स्थानिक चार व्यक्तींमध्ये वाद झाले. या वादातून एका पर्यटकाने चाकू काढून हल्ला केला. या हल्ल्यात गणेश परसाया रा. शेंडी, सुनील मधे, गणेश मधे, नवम मधे रा, चिंचोडी ता. अकोले हे चार जण जखमी झाले आहेत. या जखमींवर शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट
राजूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कोल्हार घोटी रस्त्यावर नाकाबंदी केली. मात्र त्याअगोदरच दोन आरोपी पसार झाले होते, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अक्षय अशोक जाधव वय 25 रा. अकोले याने आपणास दोघांनी शेंडी येथे सोडून दिल्याचे पोलिसांना सांगितले. आपण इंजिनियर असून ठेकेदारीचे काम करीत आहे. आपल्याबरोबर असलेले मित्र नगर व नाशिक येथील असल्याचे त्यानी सांगितले. हा प्रकार कशामुळे घडला याची माहिती पोलीस घेत आहे. फरार झालेल्या दोन शोध सुरु असल्याचे राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सांगितले.
Web Title: Latest News tourists stab locals