Home अकोले अकोले: टाकळी ते ऊंचखडक रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे अन्यथा आंदोलन

अकोले: टाकळी ते ऊंचखडक रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे अन्यथा आंदोलन

अकोले: प्रजिमा-१८ अगस्ति-शेरणखेल मार्ग टाकळी शिव ते ऊंचखडक शिव इथपर्यंत चा रस्ता संपूर्णपणे उखडून  गेला आहे. त्या रस्त्याचे काम अतिशय तातडीने करण्यात यावे  तसेच अतीवृष्टी मुळे सर्व ओढे-नाले वाहुन रस्त्यावरती पाणी येत आहे,अतीशय जुने सिडी वर्क तसेच नव्याने ज्या ठिकाणी सिडीवर्कची आवश्यकता आहे  त्या ठीकानी सिडी वर्क चा सर्वे करुन प्रस्ताव तयार करावेत व रस्त्याचे काम पाऊस ऊघडल्या नंतर लगेच करण्यात  यावे असे निवेदन मा.श्री भांगरे साहेब व इंजी काकडे साहेब यांना दिले.

तसेच  अतीवृष्टी ने पिकांचे झालेल्या नुकसानीचे अतीशय तातडीने  पंचनामे करुन सटेलाईट पीक्चर वरती पंचनामे न करता प्रत्यक्ष पहानी करुन ८- अ नुसार सर्व पिकांचे पंचनामे करावेत तसेच ऊभ्या पीका बरोबर कापणी केलेल्या पींकांचे ही पंचनामे करावेत तालुक्याची भौगोलिक रचना डोंगराळ आसल्याने पंचनाम्यास ऊशीर होतो आहे तरी मनुष्यबळात वाढ करून  पंचनामे करावेत व शेतकर्यास एकरी ५० हजार रुपये मदत  देण्यात यावे, असे निवेदन मा,तहसिलदार साहेब,अकोले यांना देन्यात आले तदप्रसंगी मा. श्री महेशराव नवले (संस्थापक अध्यक्ष युवा स्वाभिमान सामाजिक संघटना) मा,श्री सुनिल पुंडे (ता,उपाध्याक्ष भाजपा युवा मोर्चा) मा.श्री निलेशराव तळेकर (सेक्रेटरी युवा स्वाभिमान सामाजिक संघटना)मा.श्री गणेश तोरमल(ता,अध्यक्ष युवा स्वाभिमान सामाजिक संघटना)मा,श्री सुरेशराव नवले( मुख्य संघटक युवा स्वाभिमान सामाजिक संघटना) मा.श्री अमोल पवार (उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी युवा स्वाभिमान सामाजिक संघटना) मा.वैभव सावंत(सदस्य युवा स्वाभिमान) मा.अमीत नवले, सुरेशशे ठ साबळे यांच्या सह्यांनीशी निवेदन प्रत्यक्ष  देण्यात  आले. प्रजिमा-१८ टाकळी ते ऊंचखडक या रस्त्याचे काम तातडीने न केल्यास युवा स्वाभिमान स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात . 

Website Title: Latest News road from the canal to the highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here