Latest News: कांद्याच्या शेतात आढळले नवजात अर्भक
शेवगाव: शेवगाव तालुक्यातील ढोरसडे गावाच्या शिवारात कांद्याच्या शेतात स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना खबर दिली.
ढोरसडे गावातील शेतकरी बाबासाहेब खंबरे यांच्या शेतात कांदा लागवड केलेल्या क्षेत्रात अज्ञात व्यक्तीने स्त्री जातीचे अर्भक एका झाडाच्या बाजूला ओलसर जमीन करून उकरून त्यात त्यांनी ठेवले होते. सकाळी अकरा अकरा वाजेच्या सुमारास बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने ही बाब शेतात काम करणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्याने पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना देताच ते घटनास्थळी दाखल झाले. ढिकले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला संपर्क साधून डॉक्टरांना बोलाविण्यात आले. डो. कैलास कानडे यांनी नवजात बालकाची आरोग्य तपासणी केली त्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
त्याचबरोबर पोलीस निरीक्षक ढिकले यांनी अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेला संपर्क साधून बाळाचे संगोपन करण्याबाबत विनंती केली आहे.
ही मन हेलावणारी घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत होते. शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Website Title: Latest news Newborns found in onion fields