खऱ्या सरकारची, खरी कर्जमाफी: महसूल मंत्री थोरात
खरी मदत… खरा फायदा..!
खऱ्या सरकारची, खरी कर्जमाफी..!
महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आधार देण्याचा शब्द महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पूर्ण करत आहे. दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा आज झाली आहे. शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपून आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत आहोत.
ऑनलाइन अर्जाच्या नावाखाली मागील सरकारने शेतकऱ्यांचा जो अपमान केला होता, पती-पत्नीला एकत्रित बोलावून रांगेत उभे करून शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्याचे पाप केले होते, आम्ही मात्र कर्जमाफी हा शेतकऱ्याचा हक्क आहे असे मानतो, त्यामुळे शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमाफी दिली जाईल.
महाराष्ट्र विकास आघाडी
Website Title: Latest News loan waiver Balasaheb Thorat