पाचनईच्या जंगलात दारू जप्त, दारू विक्रेत्यांना अटक
राजूर: अकोले तालुक्यातील पाचनईच्या जंगलात मुरबाड तालुक्यातून विक्रीसाठी ट्युबमध्ये भरून आणलेली गावठी ९० लिटर दारू राजूर पोलिसांनी सोमवारी जप्त केली. यात मुरबाड तालुक्यातील पाच जणांना अटक केली आहे. लॉकडाऊनच्या काळात मध्याविक्री बंद असतानाही छुप्या पद्धतीने दारू विक्रेत्यांना राजूर पोलिसांनी सापळा रचून अटक करण्यात आली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर परिसरातील दारू विक्रेत्यांना चांगलाच चोप लगाविला आहे. दारू मिळत नसल्याने येथील काही तळीरामानी पाचनई परिसरातील कोकणकड्याच्या खालील बाजूस असणाऱ्या वाडीवरहे येथून हातभट्टीची दारू येत असल्याचा तपास लावला केवळ दारूसाठी ही मंडळी पाचनई शिवारात जात होती. या परिसरातील काही जुने सारहित लोकही दारू आणण्यासाठी जात होते. अनेकवेळा वनविभागाच्या कर्मचारी यांनी समज दिली होती. मात्र त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता. डॉ. किरण लहामटे यांच्या कानावरदेखील घातले होते. त्यांनी तत्काळ माहिती पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना दिली असता पोलीस निरीक्षक पाटील यांच्या टीमने सापळा रचत गावठी दारू जप्त केली आणि पाच जणांना अटक करण्यात आली.
Website Title: Latest News liquor dealers arrested