Home संगमनेर काम सुधारा अन्यथा बदली करून जा: आ. डॉ. किरण लहामटे

काम सुधारा अन्यथा बदली करून जा: आ. डॉ. किरण लहामटे

घारगाव: अकोले मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांनी रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घारगाव पोलीस स्टेशनला अचानक भेट दिली. पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या कामाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कामात सुधारणा होत नसेल तर बदली करून जा अशा शब्दात लहामटे यांनी सुनावले.

आमदार लहामटे रविवारी मतदार संघातील बोटा येथे एका दशक्रियाविधीसाठी आले होते. दशक्रिया विधी संपल्यावर परिसरात होत असलेल्या चोऱ्यांचे संदर्भात नागरिकांनी त्यांच्यापुढे तक्रारीचा पाढा मांडला. आमदार लहामटे यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लगेच घारगाव पोलीस स्टेशन गाठले.  पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या केबिनमध्ये जाऊन बसले. यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या पोलीस कर्मचारी यांच्याकडून परिसरात होत असलेल्या चोर्यांच्या तपासाबाबत माहिती घेतली. यावेळी पोलिसांनी आम्ही चोर्यांचा तपास करीत आहोत. काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते मात्र बाल न्याय मंडळाने त्यांना सोडून देण्याचे आदेश दिले.

पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी संख्या कमी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस निरीक्षक भुसारे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधात परिसरातील चोर्यांचा संपर्क लागत नाही अशा तक्रारी आल्याचे सांगून त्यावर मला उत्तर द्या जर कामात सुधारणा होत नसेल तर बदली करून घ्या. मी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलतो. अशा शब्दात सुनावले. लोकाच्या तक्रारी येणार नाहीत असे काम करा. त्याचबरोबर तुमच्या भागातील वाळू माफियांवर अंकुश ठेवण्याच्या सूचना दिल्या. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात घारगाव येथे जनता दरबार घेणार आहोत असेही आ. लहामटे यांनी सांगितले.

वाचा:अकोले: उस बैलगाडी प्रवरा नदीत कोसळली

वाचा: अकोले बसस्थानकावर ३ तोळे सोन्याचा हार लांबविला

Website Title: Latest News Improve the work or else move on Kiran Lahamte

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here