पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण, खंडणीखोराना अटक
कर्जत: पिस्तुलाचा धाक दाखवून जामखेड येथील एकाच्या अपहरण करत मारहाण करून दोन लाखाची खंडणी वसूल करणाऱ्या तिघा जणांना जवळके येथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी कर्जत येथील पत्रकार परिषद दिली.
तसेच या आरोपींकडून दोन गावठी कट्यासह गुन्ह्यात वापरलेली चार चाकी वाहन रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे श्री सिंह यांनी सांगितले यावेळी श्री सिंह कर्जत उप विभागाने अत्यंत चांगली कामगिरी केली असल्याचे गौरव उद्गार काढत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व त्यांच्या टीमचे कौतुक केले. श्री सातव यांच्यासह पोलीस पथकाने जामखेड येथील जवळके येथून खंडणीच्या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवली असून त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडी व ४० हजार रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे याशिवाय गेल्या एका महिन्यात कर्जत उप विभागात १० ठिकाणी कारवाई करत गावठी दारूचे समूळ उच्चाटन केले असल्याचे पोलीस उप अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी उप विभागातील सर्व पोलिसांचे कौतुक केले आहे या दोन्ही कामगिरीबद्दल कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हि माहिती दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील कर्जतचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड जामखेड पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील उपस्थित होते.
पिंपळगाव उंडा तालुका जामखेड येथील फिर्यादी सोमनाथ शिवदास जगताप हे २५ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता घरी असताना हॉटेल चालविण्याच्या कारणावरून आरोपी नंदकुमार गोरे सचिन मिसाळ यांनी दोन गावठी कट्यांचा धाक दाखवून हॉटेल चालविण्यासाठी शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या इनोव्हा गाडीमध्ये बळजबरीने टाकून आरोपी नंदकुमार गोरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये नेले याठिकाणी जगताप यांना लाकडी दांडक्याने बाबूने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या वडिलांकडे हॉटेल चालविण्याच्या नावाखाली दोन लाख रुपये मागत त्यास सोडून दिले. तसेच पोलीस तक्रार दिली तर तुम्हाला संपवून टाकू अशी धमकी दिली.
Website Title: Latest News Hijacked by a pistol