कोतूळ : जून महिण्यात रूसलेला पाऊस गेल्या पंधरा दिवसांपासून अकोले तालुक्यात जोरदार बरसत आहे. रविवारी पहाटे दोन वाजल्यापासून हरिश्चंद्र गड, पाचनई परिसरात धो धो बरसणाऱ्या पावसाने जनजिवन विस्कळीत झाले आहे.
मुळा नदीला जास्त विसर्ग असल्याने मुळा नदीने रौद्ररूप धारण केले होते. नागरिकांनी मुळा नदीचे रौद्र रूप पाहण्यासाठी कोतूळ – राजूर रस्त्याच्या पुलावर गर्दी केली होती. गतवर्षी नदीला एवढा मोठा पूर आला नव्हता. अनेक ठिकाणी शेतांचे बांध फुटले आहेत. शेतांमध्ये तुडूंब पानी भरलेले आहे. या पावसाने सोयाबिन, भूईमुग, मका, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोतूळ सह मुळा पट्टयात गेल्या पंधरा दिवसांपासून सुर्यदर्शन झालेले नाही. सतत पाऊस पडत असल्याने ऊस वगळता सर्व पिके धोक्यात आली आहे. पाऊस उघडला तरी पाच ते सहा दिवस शेतातील पाणी आटणार नाही.
Website Title: Latest News Floods Of MULA River In Kotul Area