अकोले: मलमपट्टी नको,दर्जेदार काम करा: डॉ. किरण लहामटे
अकोले: नुसती मलमपट्टी नको,दर्जेदार काम करा. आता किरण लहामटे आमदार आहे हे लक्षात ठेवा असा सज्जड इशारा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सार्वजनिक बांधकामाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर काकडे यांना दिला.
पावसाने रस्ते खड्डेमय झाले आहेत. हे खड्डे तातडीने बुजवा, खड्डे बुजविण्याचे काम येत्या दोन चार दिवसांत हाती घ्या. जनता दरबार लावणार आहे. तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. खड्डे भरण्याचे चांगले काम झाले पाहिजे. संगमनेर अकोले राजूर या रस्त्याचे काम मंजूर आहे. कोतूळ बोटा व कोतूळ कोथळे या रस्त्याकडे लक्ष द्या. अशी सुचना डॉ. किरण लहामटे यांनी काकडे यांना दिला.
पाउस थांबताच पुढच्या आठवड्यात खड्डे बुजविण्याचे काम सुरु होईल. संगमनेर अकोले रस्त्याचे काम सुरु होईल. काही रस्त्यांच्या वर्क ओर्डेर निघाल्या नाहीत, असे काकडे यांनी लहामटे सांगितले.
Website Title: Latest News Do quality work Kiran Lahamte