Home अहमदनगर अहमदनगरमधील करोना संशियीत वृद्धाचा पाय घसरून पडल्याने मृत्यू

अहमदनगरमधील करोना संशियीत वृद्धाचा पाय घसरून पडल्याने मृत्यू

नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या करोना विलगीकरण कक्षातील बाथरुममध्ये पाय घसरल्याने ८० वर्षीय वृद्धाचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. हे मयत वृद्ध अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शनिवारी मधुमेह हृदयाचा त्रास होत असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

या आजोबांच्या तपासणीत त्यांना सर्दीचे लक्षण आढळून आले होते. त्यामुळे करोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्दीच्या रुग्णांनाही करोना संशयित म्हणून उपचार करण्याचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे या वृद्धालाही जिल्हा रुग्णालयातील करोना संशियीत कक्षात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री लघुशंकेसाठी बाथरूममध्ये गेले असता तिथे पाय घसरून पडले आणि जागीच बेशुद्ध झाले. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

अहमदनगर नगर जिल्ह्यातील करोना संशियीत वृद्धाचा मृत्यू झाल्याने अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. त्या वृद्धाचा मृत्यू करोना आजाराने झाला का यासंदर्भातील तपासणी करण्यासाठी त्यांचे स्वॅबचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच काय ते स्पष्ट होईल असे संगमनेर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितले. वृद्धाला करोणाचा संसर्ग झाला होता की नाही हे अहवाल आल्यानंतरच समजणार आहे.  मंगळवारी रात्रीपर्यंत अहवाल येणे अपेक्षित आहे.

Website Title: Latest News Corona suspected old man dies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here