नववर्षानिमित्त अकोले मतदारसंघ गुन्हेगारीपासून मुक्त करण्याचा संकल्प: आ. डॉ. लहामटे
अकोले: अकोले मतदारसंघात ठिकठिकाणी अवैध धंदे राजरोसपने चालू आहेत. राजूरमध्ये मात्र पूर्णपणे दारूबंद विक्री बंद करण्यास मी यशस्वी झालो. त्याप्रमाणेच अवैध धंद्यावाल्यांचा बिमोड करण्यासाठी कंबर कसली असून त्यांचा कर्दनकाळ ठरून मतदारसंघ गुन्हेगारी मुक्त करणार असल्याचा संकल्प आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला आहे.
नववर्षाच्या संकल्पाविषयी पत्रकारांशी संवाद साधत्ताना आमदार डॉ. लहामटे पुढे म्हणाले, कोल्हार घोटी राज्य मार्गाच्या कामाचा दर्जा उत्तम ठेऊन कमीत कमी पाच ते दहा वर्ष त्या रस्त्यावर पुन्हा काम करण्याची गरज नाही. ठेकेदाराला ताकीद दिलेली आहे. अकोले तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने येथील रस्ते दरवर्षी खराब होतात असे यापूर्वीच्या आमदारांचे मत होते असा टोला त्यांनी वैभव पिचड यांना लगाविला.
परंतु आता हेच रस्ते टक्केवारी बंद करून प्रामाणिकपणे दर्जेदार काम करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही सामान्य नागरिकाला सरकारी कामासाठी सतत हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही. यासाठी नववर्षात यंत्रणा उभी करणार आहोत. राजूर गावात जशी दारूबंदी यशस्वी केली आहे. त्यानुसार मतदार संघातील अवैध धंदे बंद करण्यात यशस्वी होणार आहे. तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडवून मतदारसंघाचा विकास करणार असल्याचा विशास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान आ. डॉ. लहामटे यांच्या नववर्षाच्या संकल्पनिमित्त अवैध धंद्यावाल्यांवर संक्रांत कोसळणार हे मात्र नक्की. त्यातून सर्व सामान्या नागरिक मोकळा श्वास घेतील.
Website Title: latest news concept of getting rid of crime