तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेल: बच्चू कडूचा इशारा
मुंबई: बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एक शेतकरी त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आला होता. मात्र मातोश्रीच्या बाहेर तैनात असलेल्या पोलिसांनी अडवून त्या शेतकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली. यावर सर्व सामान्य शेतकरी, नागरिक यांची भेट मुख्यमंत्री यांनी घेतलीच पाहिजे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांची अडवणूक करणे चुकीचे आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतलीच पाहिजे. आज जी चूक झाली आहे ती सुधारणे गरजेचे आहे असे बच्चू कडू यांनी सांगितले. जर असा काळ पुन्हा आला तर मी मंत्रालायाबाहेर खुर्ची टाकून बसेल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
पनवेलहून एक शेतकरी आपल्या शेती व कर्जाच्या समस्याबाबत गऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी आला होता. त्याच्या सोबत आठ वर्षाची मुलगी होती. सकाळपासून मातोश्री बाहेर उभे राहून सुद्धा पोलिसांनी शेतकऱ्यांची अडवणूक केली. यानंतर शेतकरी व त्याच्या मुलीला खेरवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.
Website Title: Latest News Bacchu Kadu warning