Home अहमदनगर वधुने खोटी माहिती दिल्याने लग्नाआधीच वधु वरासह १३ जण अटकेत

वधुने खोटी माहिती दिल्याने लग्नाआधीच वधु वरासह १३ जण अटकेत

कोपरगाव: लॉकडाऊन मध्ये लग्न करण्याच्या घाईने वधु वर थेट पोलिसांच्या बेडीत अटकल्याची घटना कोपरगाव येथील मुर्शदपूर येथे घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवरदेव हा मुंबईतील रेडझोन भागातील असून नवरी ही कोपरगाव येथील मुर्शदपूर येथील आहे. यांना लग्नाला करवयाचे असल्याने मात्र प्रशासन या लग्नाला परवानगी देणार नसल्याचे असे गृहीत धरून नवरदेव कोपरगाव येथील असल्याची खोटी माहिती मुलीच्या नातेवाईक यांनी तहसीलदारांना दिली.

वधू आणि वराने व तसेच नातेवाईक यांनी  चोरून लग्नस्थळ गाठले अन पोलिसांच्या बेडीत ते अडकले. या फसवणुकीप्रकरणी तलाठी धनंजय यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नवरदेव आकाश राजू सरोदे व नवरी आश्लेषा उत्तम भालेराव यांच्या सह १३ जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना तहसीलदारांना खोटी माहिती देणे महागात पडले आहे.   

Website Title: Latest News arrested before the wedding for giving false information

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here