अकोले: रुंभोडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
अकोले: तालुक्यातील रुंभोडी येथील रवींद्र रामचंद्र गायकवाड यांच्या गोठ्यातील वासरांवर काल पहाटे ३ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यात वासराच्या गळ्यावर जखमा होऊन ते गतप्राण झाले.
रूंभोडी येथील प्रवरा नदीच्या तिरावर गायकवाड यांच्या घराशेजारीच उघडा गोठा आहे. याचाच फायदा बिबट्याने घेऊन वासरावर हल्ला चढविला. याची भरपाई द्यावी तसेच या भागात वनखात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यापूर्वीही बिबट्याने रवींद्र गायकवाड यांच्या कालवडीवर हल्ला केला होता. एक बिबट्या मेहेंदुरी शिवारात उसात असल्याचे नागरिक सांगतात.
या परिसरात लहान मुलेदेखिल खेळत असतात. त्यांच्या जिवीतास देखील या बिबट्यामुळे धोका होऊ शकतो. म्हणून वनखात्याने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी रुंभोडीचे उपसरपंच बाळासाहेब मालुंजकर, पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे, रवींद्र गायकवाड, विलास गायकवाड, राजेंद्र गायकवाड, मोहन शिंदे, विकी गायकवाड, भाऊराव गायकवाड, शाम गायकवाड आदींनी केली आहे.
Website Title: Latest News Akole: The Calf Shoots Dead In Leopard