पायपीट करणाऱ्या मजुरांच्या मदतीला धावले आमदार डॉ.किरण लहामटे व धामणगावपाटचे तरुण
धामणगावपाट: लॉक डाऊन चे काही नियम शिथिल करत राज्य सरकारने विविध भागात अडकलेल्या मजुरांना घरी जाण्यास मुभा दिली आहे. परंतु प्रशासन व मजूर यांच्यामध्ये समन्वय होत नसल्याने बरेच मजूर पायपीट करत घराकडे निघालेले आहेत. असेच काही मजूर संगमनेरच्या साकुर फा धामणगाव पाट मध्ये महादेव मंदिराजवळ मुक्कामासाठी थांबले अंगावर फाटके कपडे, डोक्यावर संसाराची गाठोडी, सोबत तीन चिमुरडी मुलं आणि सहा सात महिन्याचे बाळ त्यात खाण्यासाठी तीन दिवस वाळलेल्या भाकरी असे विदारक दृष्य पहायला मिळाले. काळीज पिळवटून टाकणारी ही त्यांची अवस्था पाहून सुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळा विभाग प्रमुख निलेश घुले व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वैभव चौधरी,दीपक चौधरी तेजस चौधरी,कार्तिक राऊत या तरुणांनी स्वतः पुढाकार घेत वर्गणी काढून त्यांच्या जेवणाची सोय केली. दुसऱ्या दिवशी निलेश घुले यांनी आमदार डॉ.किरण लहामटे यांच्याशी संपर्क साधून या मजुरांची मूळ गावी जाण्याची सोय करावी अशी विनंती केली.
गोरगरिबांना मदत करण्यात आघाडीवर असलेले कर्तव्यदक्ष आमदार डॉ.किरण लहामटे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सूत्रे हलवली. परंतु वाहनाची व्यवस्था होत नव्हती शेवटी आमदारांनी निलेश घुले व प्रणित उगले यांना स्वतःची गाडी घेऊन मजुरांना सोडण्याची विनंती केली.
राजूर येथे गेल्यावर स्वतः आमदारांनी कामगारांसाठी मास्क व जेवणाची व्यवस्था केली.
प्रशासकीय कागदपत्रांचे सर्व सोपस्कर पार पाडून निलेश घुले व प्रणित ऊगले यांनी स्वतः त्यांना त्यांच्या मूळ गावी (मु.पो.केळघर ता.मोखाडा जि. पालघर) येथे सोडले तिथे गेल्यावर तेथील स्थानिक गावकऱ्यांनी व स्थानिक प्रशासन यांनी निलेश घुले व प्रणित उगले यांचा सत्कार करून त्यांचे खूप खूप आभार व्यक्त केले….
धामणगाव पाटच्या स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभार
सदर मजूर धामणगाव पाट मध्ये मुक्कामी होते परंतु उपसरपंच विष्णू भोर सोडून इतर कुणीही स्थानिक प्रशासनाने किंवा कोरोणा कमिटी सदस्यांनी त्यांची दखल घेतली नाही बारा तास उलटून गेल्यावर कॉल केल्यावर ग्रामसेवक चौकशीसाठी आले राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बेजबाबदारपणा बद्दल त्यांना चांगलाच जाब विचारला इतर गावांचा विचार केला असता धामणगाव पाट चे स्थानिक प्रशासन चांगल्या प्रकारे सक्रीय नसल्याचे जाणवते असे तरुणांचे मत आहे.
आमच्याकडे लहान मुलं होती आणि आमच्या जवळच्या आणलेल्या भाकरी सुद्धा संपल्या होत्या आता पुढे कसं जायचं असा प्रश्न समोर असताना धामणगाव पाठ च्या पोरांनी आम्हाला देवासारखी मदत केली. त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. सुरेश मुकने(मजुर)
Website Title: Latest news aid of the piping workers Kiran lahamte