Home अहमदनगर Online Fraud: महिलेस ऑनलाईन ८० हजार रुपयास गंडा

Online Fraud: महिलेस ऑनलाईन ८० हजार रुपयास गंडा

Ladies Online Fraud 80 thousand 

अहमदनगर | Online Fraud: तारकपूर येथे राहणाऱ्या एका महिलेने राजकोट येथून कुरियरच्या माध्यामातून कपडे मागविण्यात आले होते, पार्सल वेळेत न मिळाल्याने या महिलेने गुगलवर सर्च करून एकसप्रेसबीस या कुरियर कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक शोधून काढला, फोन केला असता नंबर हा बनावट होता या क्रमांकवर महिलेने पार्सलविषयी विचारपूस केली असता सांगितले की, तुमचे पार्सल नगर येथे आले आहे. लॉकडाऊन असल्याकारणामुळे घरी पोहोचले नाही. आपली तक्रार कुरियर कंपनीला पाठवितो. असे सांगून सदर व्यक्तीने गुगल पे च्या माध्यमातून १ रुपया पाठविण्यास सांगितले. महिलेने गुगल पे वरून सदर व्यक्तीला १ रुपाया पाठविल्यानंतर त्या महिलेच्या खात्यातून ५ हजार रुपये कपात झाले.

यावेळी महिलने फोन करून पैसे कपात झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यावेळी त्या व्यक्तीने एक लिंक पाठवितो. तुमचे पैसे येऊन जातील. त्या महिलेने लिंकवर क्लिक करून प्रक्रिया केली असता तिच्या खात्यातून आणखी पैसे कपात झाले. या महिलेची एकूण ७९ हजार ८४४ रुपयांची का[कपात झाली.

ही घटना १२ मे रोजी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Web Title: Ladies Online Fraud 80 thousand 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here