Home अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली मात्र मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली मात्र मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

Ahmednagar Corona Death rate increased

अहमदनगर | Ahmednagar: रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होत चालली आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत १८५१ ने वाढ झाली. एकीकडे रुग्ण कमी होत असले तरी कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र अजूनही चिंताजनक आहे.

रविवारी जिल्ह्यात ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील नोडल अधिकारी यांनी दिली. सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या १५ हजार २८४ इतकी झाली आहे. जिल्ह्यात रविवारी २७९९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २० लाख ३० हजार ४०३ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील बरे होण्याचे प्रमाण ९२.७१ टक्के इतके झाले आहे. तसेच रोज वाढत असणारी रुग्णसंख्या आता घटत चालली आहे,

रविवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांत मनपा १४५, अकोले १६४, जामखेड १४१, कर्जत २०८, कोपरगाव १५२, नगर ग्रामीण २५४, नेवासा १८७, पारनेर १५८, पाथर्डी १६१, राहता १६१, राहुरी १७२, संगमनेर ३०८, शेवगाव १८१, श्रीगोंदा १८७, श्रीरामपूर १६३, कॅन्टोन्मेंट १०, इतर जिल्हा ४६ इतर जिल्हा १ असा रुग्णांचा समावेश आहे.  

Web Title: Ahmednagar Corona Death rate increased

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here