ब्रेकिंग न्यूज ! नगरमध्ये आवळल्या कोयत्या गँगच्या मुसक्या
Breaking News | Koyta Gang Arrested: पुणे येथे कोयत्याच्या धाकावर दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
अहमदनगर: पुणे येथे कोयत्याच्या धाकावर दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. केडगावातील एका हॉटेलमध्ये आरोपी थांबलेले असताना पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीच्या पथकाने सापळा लावून कारवाई केली.
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, केडगाव परिसरात पुणे येथील आरोपींची टोळी एका हॉटेलमध्ये बसलेली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ हॉटेल परिसरात सापळा लावला व आरोपींना अटक केली.
गणेश बबन खारे (वय २६, रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर), कैवल्य दिनेश जाधवर (वय १९, रा. अंबाजोगाई, जि. बीड), ऋषिकेश हरी आटोळे (वय २०, रा. पडवळनगर, थोरगाव, पुणे), सुमित सिद्राम माणे (वय २३, रा. शिवराजनगर, राहटणी, पुणे), प्रीतम सुनील भोसले (वय २१, रा. आदर्शनगर, काळेवाडी, पुणे), विराज विनय शिंदे (वय २०, रा. पर्वती, पुणे), रोहित मोहन खताळ (वय २२, रा. थेरगाव, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
सुमित माने व रोहित खताळ हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. वाकड पोलिस ठाण्यात खुनी हल्ला, मारहाण, आर्म ॲक्ट, दरोडा, चोरी अशी गुन्हे आरोपींवर आहेत.
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शाहीद शेख, रवींद्र टकले, राहुल शिंदे, योगेश कवाष्टे, सलीम शेख, दीपक रोहकले, तानाजी पवार, सूरज कदम, सत्यजित शिंदे, महेश पवार, शिवाजी मोरे, प्रमोद लहारे, लोळगे यांनी ही कारवाई केली.
Web Title: Koyta Gang Arrested in Ahmednagar
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study