तरुणीची पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ
Ahmednagar News Live | Kopargaon | Suicide | कोपरगाव: कोपरगाव शहरात धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शहरातील मोठ्या पुलावरून एका अज्ञात तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रोजी घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव नगर पालिकेच्या अग्निशामक दलाचे मदन निंदाने, कार्तिक मालकर, चेतन गव्हाणे, घनधाम कुर्हे आदींसह कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह कर्मचारी या तरुणीचा शोध घेत आहे. या मुलीच्या शोध लागल्यानंतर या घटनेची संपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस व अग्निशमन दलाचे कर्मचारी शोध घेत आहे.
Web Title: Kopargaon young woman committing suicide by jumping off a bridge