Home अहमदनगर गॅसच्या टाकीचा अचानक स्फोट होऊन घराचे पत्रे उडाले

गॅसच्या टाकीचा अचानक स्फोट होऊन घराचे पत्रे उडाले

Kopargaon gas tank suddenly exploded, blowing up the house

Kopargaon | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील वेस येथे स्वयंपाकाच्या गॅसच्या टाकीचा अचानक स्फोट होऊन घराचे पत्रे उडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये घरातील सामानही जळाले आहे. गॅसच्या स्फोटामुळे घरात सामानचा खच पडला होता.  बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  सुदैवाने या घटनेत  जिवीत हानी झाली नाही.

वेस-सोयगाव येथे गुलाब कुंडलीक कोल्हे हे पत्नीसह राहतात. बुधवारी सकाळी गुलाब कोल्हे यांच्या पत्नी चंद्रकला या स्वयंपाक करत असताना एच.पी.कंपनीच्या गॅसने अचानक पेट घेतला.गॅसने पेट घेतल्याने एक मिनीटभर काय करावे हे त्यांना कळेना. गुलाब कोल्हेही घरातच होते. दोघेही मदतीसाठी इतरांना आवाज देण्यासाठी घराबाहेर पडले व लगेच गॅसच्या टाकीचा स्फोट झाला.स्फोटामुळे परिसररात मोठा आवाज झाला. स्फोटामुळे घराचे पत्रे उडाले. आसपास घरे होती मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. अजून एक मिनीट जर ते घराच्या बाहेर पडले नसते तर मोठा अनर्थ झाला असता.

यावेळी आसपासचे लोक जमा होऊन घरातील आग विझविली. दोघेही घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. गॅसने कशामुळे पेट घेतला याचे नेमके कारण समजू शकले नाही. माहीती मिळताच कोपरगाव गॅस कंपनीचे व्यवस्थापक लक्ष्मण निमसे तातडीने घटनास्थळी पोहचले त्यांनी गॅसची पुनर्जोडणी करून देणार असल्याचे सांगीतले. निमसे म्हणाले,गॅस ग्राहकांनी आपण ज्या एजन्सीकडून गॅस घेतला आहे त्यांच्या वितरकांकडुनच गॅस टाक्या घेत जाव्यात. म्हणजे काही अडचण निर्माण झाल्यास मदतीस सोपे होते.

Web Title: Kopargaon gas tank suddenly exploded, blowing up the house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here