मुलाने वडिलांच्या डोक्यात गज घालून मारहाण व शिवीगाळ
कोपरगाव | Kopargaon: तालुक्यातील सांगवी भुसार येथील एका शेतकऱ्यास स्वतःचे मुलाने गज डोक्यात घालून मारहाण केल्याची घटना घडली आहे. ऐन दसरयाच्या दिवशी सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील शेतकरी प्रकाश गंगाधर मेहेरखांब वय ५७ यांनी मुलगा सुरज प्रकाश मेहेरखांब याला विचारले की, तु घरातील बाजरीचे धान्याचे पोते का विकले असे विचारल्याचा मनात राग धरून आरोपी सुरज या मुलाने वडील प्रकाश मेहेरखांब याने शिवीगाळ करत ओट्याच्या खाली पाडून मी तुला जिवंत ठार मारतो, असे म्हणत लोखंडी गजाने डोक्यावर व पायावर वार करत जखमी केले.
वडील प्रकाश मेहेरखांब यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून आरोपी मुलगा सुरज प्रकाश मेहेरखांब याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Kopargaon father’s head and beats and abuses