Home अहमदनगर दारू पिऊन आरोग्य कर्मचाऱ्याचा धिंगाणा

दारू पिऊन आरोग्य कर्मचाऱ्याचा धिंगाणा

Kopargaon Dhingana of a health worker after drinking 

कोपरगाव | Kopargaon: लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला कर्तव्य बजावत असताना दारू पिऊन आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याने शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. या मद्यपी कर्मचाऱ्याला पोलिसांनी समजाविण्याचा प्रयत्न केला मात्र अंगात दारूची धुंदी असल्याने पोलिसांना देखील त्याने दाद दिली नाही.

अखेर पोलिसांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात नेऊन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. कोपरगाव तालुक्यातील वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सतीश म्हस्के असे या आरोग्य कर्मचाऱ्याचे नाव आहे.

बुधवारी भरत गंगाधर वाघ हे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. लसी संदर्भातील नोंदणीचे काम म्हस्के यांच्याकडे होते. वाघ यांनी लसी संदर्भात म्हस्के यांच्याकडे चौकशी केली असता त्यावर म्हस्के यांनी थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर इतर ग्रामस्थांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. दारू पिलेला असल्याने त्याचा धिंगाणा सुरूच होता. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस कर्मचारी यांनी देखील म्हस्के यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने काही एक ऐकले नाही. शेवटी पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याने दारू पिली असल्याचा अहवाल त्यांना प्राप्त झाला. त्यामुळे पोलिसांनी म्हस्के यांच्यावर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Kopargaon Dhingana of a health worker after drinking

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here