अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी अटकेत
कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव शहरातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीस २४ तासांत पोलिसांनी अटक केली आहे. सदर अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कोपरगाव शहरातील एका रोजंदारी करणाऱ्या कुटुंबातील बारा वर्षीय मुलीस १५ फेब्रुवारी सोमवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास लघुशंकेस जाऊन येथे असे सांगत गायब झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पालकांनी संशयित आरोपी राजू पोपट पगारे रा. तळवाडे ता. येवला जि. नाशिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या आरोपीस अटक करण्यात आली असून मुलीस पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपीस कोपरगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Title: Kopargaon Accused of kidnapping minor girl arrested